श्रावण पाऊस जुलै 1989
नागाच्या डौलात
मोराच्या तालात
पावसाची सर पडतेय ग
श्रावण नाचरा पडतोय ग ।। १ ।।
दुरच्या रानात
कोकिळा सुरात
मल्हार सप्तात गातेय ग
श्रावण सुरीला पडतोय ग ।। २ ।।
पावसाच्या थेंबात
केळीच्या पानात
कान्हाचा पावा वाजतोय ग
श्रावण मनमोहन पडतोय ग ।। ३ ।।
कपिली गाई
बावरून जाई
तान्हुल्या वासरा शोधतेय ग
श्रावण लेकुरवाळा पडतोय ग ।। ४ ।।
सख्याच्या मनात
प्रियेच्या कानात
गालावर लाली चढतेय ग
श्रावण सखा पडतोय ग ।। ५ ।।
नागाच्या डौलात
मोराच्या तालात
पावसाची सर पडतेय ग
श्रावण नाचरा पडतोय ग ।। १ ।।
दुरच्या रानात
कोकिळा सुरात
मल्हार सप्तात गातेय ग
श्रावण सुरीला पडतोय ग ।। २ ।।
पावसाच्या थेंबात
केळीच्या पानात
कान्हाचा पावा वाजतोय ग
श्रावण मनमोहन पडतोय ग ।। ३ ।।
कपिली गाई
बावरून जाई
तान्हुल्या वासरा शोधतेय ग
श्रावण लेकुरवाळा पडतोय ग ।। ४ ।।
सख्याच्या मनात
प्रियेच्या कानात
गालावर लाली चढतेय ग
श्रावण सखा पडतोय ग ।। ५ ।।
निसर्ग सौंदर्य मनमोकळं गीत.
ReplyDeleteछान कविता आहे.
ReplyDelete