Saturday, 27 July 2019

पाऊस

निळे सावळे गगन भरले
पक्षी आपुल्या घरट्यात बैसले
सूर घेऊनि वारे वाहिले
विजांच्या कडकडाटासंगती
काहीशा गडगडाटासंगती
तालामध्ये पाऊस आला
धरित्रीवरती जल शिंपडले
सारे ओलेचिंब जहाले
मातीचा सुगंध दरवळला
आसमंतात तो बहरून गेला
हिरवी नाजूक वेली बहरली
लाल गुलाबी फुले फुलली
किंचित हिरवा आणिक सावळा
डोंगरही अदृश्य जाहला. कवी:-नंदकिशोर बोधक

1 comment:

  1. मनाला स्पर्श करणारी कविता आहे सर.

    ReplyDelete