तुझं असं अंगावर
चिलखत घालून जवळ येणं
मला बिल्कूल पसंद नाही
तू घाईन मारलेल्या गाठी
सुटता सुटत नाहीत
सगळा मूड खराब होतो
रोजच जगणं अन रोजचं मरणं
पार दमछाक झालीय
अन त्यात तुझं वागणं
तद्दन भांडवलदारासारखं
हक्काची गोष्ट पण
सहजी द्यायची नाही
बरं नाही एका शोषितांन
दुसऱ्या शोषिताला असं छळण
म्हणून म्हणतो थोडं सुधर
तू उद्याच
एका मलमली झग्याची शॉपिंग कर
एकदम झकास मोकळा ढाकळा
थकल्या भागल्या जीवाला
तेवढाच थोडासा चेंज
कवी:- नंदकिशोर बोधक
चिलखत घालून जवळ येणं
मला बिल्कूल पसंद नाही
तू घाईन मारलेल्या गाठी
सुटता सुटत नाहीत
सगळा मूड खराब होतो
रोजच जगणं अन रोजचं मरणं
पार दमछाक झालीय
अन त्यात तुझं वागणं
तद्दन भांडवलदारासारखं
हक्काची गोष्ट पण
सहजी द्यायची नाही
बरं नाही एका शोषितांन
दुसऱ्या शोषिताला असं छळण
म्हणून म्हणतो थोडं सुधर
तू उद्याच
एका मलमली झग्याची शॉपिंग कर
एकदम झकास मोकळा ढाकळा
थकल्या भागल्या जीवाला
तेवढाच थोडासा चेंज
कवी:- नंदकिशोर बोधक
No comments:
Post a Comment