Saturday, 18 August 2012

शुभेच्छा

शुभेच्छा
माझी फार इच्छा होती
तुला शुभेच्छा देण्याची
दिवाळी संपली पण
हिंम्मतच झाली नाही
तुझ्या घरी येण्याची
तुझं रंगकाम केलेलं सुंदर घर
तू करामती हातानं सजवलं असल
मी तुला कधी घराला पहात असल
हा बोलत का नाही
तू मला फार आवडतेस
हा विचारत का नाही
माझं तुझ्यावर प्रेम आहे
तुझी तगमग कि बेचैनी
होकार कि नकार
मी नक्कीच विचारलं असत
पण तू नाही म्हणलीस तर
तर मी उध्वस्त होईन कायमचा
म्हणून मी आलोच नाही
देवाला केलेल्या प्रार्थनेसारख
तुला दुरूनच शुभेच्छा देतो
शुभ दिपावली
तू म्हणशील का ?
सेम टु यु !
कवी:- नंदकिशोर बोधक


No comments:

Post a Comment